🔹 *शिक्षकमंच जळगाव*
जळगाव जिल्ह्यातील सर्व शिक्षक बंधू भगिनींना कळविण्यात आनंद होतो की, शिक्षकमंच जळगाव संचलित डिजिटल ई मासिक ऑगस्ट 2024 या महिन्यापासून दरमहा 10 तारखेला प्रसिद्ध केले जाणार आहे.
सदर ई मासिक जळगाव जिल्ह्यातील शिक्षक व विद्यार्थ्यांसाठी एक हक्काचे व्यासपीठ असणार आहे.
या डिजिटल मासिकाचा पहिला अंक 15 ऑगस्ट 2024 रोजी संपूर्ण राज्यात प्रसारित केला जाईल.
तरी आपणास साहित्य पाठवण्याचे आवाहन करित आहे.
▪️ मासिकासाठी खालील साहित्य पाठवू शकता.
कथा, लेख, कविता, चित्रकाव्य, प्रवास वर्णन, पुस्तक परिचय, मुलाखत, शब्द कोडी, हास्यचित्रे, व्यंगचित्रे इ.
▪️ सदर मासिकासाठी खालील विषयांवर साहित्य मागविले जात आहे. सदर मासिकासाठी आपण आपले स्वतःचे तसेच विद्यार्थ्यांचे साहित्य खालील व्हाट्सअप नंबर किंवा ई-मेल आयडीवर पाठवू शकता.
Mail ID - shikshakmanchjalgaon@gmail.com
WhatsApp no. 8806506804
9923875125
▪️ विषय -
1) शिक्षकांनी शाळेत राबविलेला नवोपक्रम ( उपक्रमाची माहिती फोटोंसह )
2) शिक्षकांची/ विद्यार्थ्यांची स्व लिखित कविता
3) विद्यार्थ्यांनी काढलेली, रंगविलेली चित्रे
4) शाळेची बातमी ( उपक्रम संदर्भात - फोटो सह )
5) शिक्षक / विद्यार्थी गौरव , पुरस्कार प्राप्त बाबत
6) स्व लिखित लेख - खालील विषयांवर
A) शिष्यवृत्ती परीक्षा मार्गदर्शन
B) 21 व्या शतकातील कौशल्ये
C) भारताचा स्वातंत्र्यदिन
D) थोर स्वातंत्र्यसेनानी
E) तंत्रज्ञान वापर
F) पर्यावरण शिक्षण
G) इतर शैक्षणिक, सामाजिक विषय
📌 मासिकासाठी साहित्य/लेख/ बातमी/ कविता पाठविताना खालील बाबी लक्षात घ्याव्यात.
१) टाईप केलेले डॉक्युमेंट फाईल किंवा मोबाइल वर टाईप करून पाठवावे. ईमेलने किंवा Whats App वर साहित्य पाठवू शकता.
२) साहित्यात योग्य ठिकाणी विरामचिन्हांचा वापर केलेला असावा. शुद्धलेखनाचे नियम पाळावे.
३) साहित्य पाठवतांना त्यात कोणत्याही प्रकारचे इमोजी, अथवा स्टार्सचा वापर करु नये.
४) आक्षेपार्ह, राजकीय, जातिभेद तेढ निर्माण करणारे साहित्य नसावे. साहित्य नकारात्मक नसावे.
५) सोबत आपला एक फोटो व अल्प परिचय द्यावा.
६) लेख शब्द मर्यादा ३०० पर्यंत. सोबत लेखासंबंधी एक/दोन फोटो देता येईल.
७) साहित्य स्वतःचे असावे. तसेच साहित्य पूर्वी कुठेही प्रकाशित झालेले नसावे.
८) विद्यार्थ्यांचे साहित्य पाठविताना ( चित्र, काव्य ) सोबत त्यांची माहिती व फोटो पाठवावा.
▪️ टिप - आपले साहित्य, माहिती, लेख, कविता इ. 4 ऑगस्ट 2024 पूर्वी पाठवावे.
🙏 कोअर टीम 🙏
शिक्षकमंच जळगाव
https://shikshakmanchjalgaon.blogspot.com/

No comments:
Post a Comment